Top Header Ad

Mahalaxmi Kirnotsav

Mahalaxmi Kirnotsav festival महालक्ष्मी किरणोत्सव

Kolhapur Mahalaxmi temple 
Mahalaxmi Kirnotsav festival महालक्ष्मी किरणोत्सव
murti puja vidhi yatra dipoutsav rathoutsav

 श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. देवालयाच्या रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे पश्चिमेच्या दिशेने असलेल्या गवाक्षातून (खिडकीतून) प्रत्येक वर्षी दोनदा अस्ताचलास जाणार्‍या सूर्यदेवाचे किरण देवीच्या मूर्तीवर पडतात. या अपूर्व सोहळ्याला ‘किरणोत्सव' म्हणतात. हा सोहळा तीन दिवस असतो. प्रत्येक वर्षी ठराविक दिवशी सूर्याचे किरण देवीच्या मूर्तीवर पडणे, हा हिंदु स्थापत्यकलेचा हा एक अनोखा आविष्कार आहे.
 facemarathi
 प्रतिवर्षी कार्तिक मासात साधारणपणे ९, १० आणि ११ नोव्हेंबर असे तीन दिवस, तसेच माघ मासात ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी असे तीन दिवस देवीचा किरणोत्सव साजरा होतो. पहिल्या दिवशी सूर्यदेवाचे किरण देवीच्या चरणांना स्पर्श करतात. दुसर्‍या दिवशी सूर्याचे किरण देवीच्या मध्यभागावर येतात आणि तिसर्‍या दिवशी ते देवीच्या मुखमंडलासह संपूर्ण मूर्तीला प्रकाशात न्हाऊन काढतात.
किरणोत्सवाच्या प्रसंगी देवीची सालंकृत पूजा केलेली असते. सूर्यकिरणांनी मूर्तीला स्पर्श करण्याच्या आधी सर्व विद्युत दीप मालवून गाभार्‍यात केवळ दोन समया तेवत ठेवल्या जातात. काही मिनिटांनंतर सूर्यकिरण गेल्यावर देवीची कर्पूरारती, तसेच देवळात घंटानाद केला जातो.

Footer Ad

Contact form